खानापूर : रविवार दि. 19 मार्च रोजी राजहंडगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम म. ए. समिती व स्वाभिमानी शिवप्रेमीच्या सहकार्याने होणार असून सदर कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या नियोजनामध्ये सुद्धा खानापूर तालुक्यातील समस्त शिवप्रेमीनी सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई होते. खानापूर तालुका म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. शेवटी सचिव श्री. एस. एन. बेडरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta