खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कडक उन्हाची झळ पोहचत आहे. अशातच खानापूर तालुक्यातील अनेक भागात आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी चापगावात गवतगंजीला आग लागून शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दि. १५ रोजी दुपारी सिंगीनकोपात (ता. खानापूर) गावापासुन काही अंतरावर वीट उद्योजक कृष्णा कुंभार याच्या वीटभट्टीवर कामाला आलेल्या वीटभट्टी कामगारांच्या १३ झोपड्याना अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दि. १५ रोजी वीटभट्टी कामगार वीटभट्टीवर कामासाठी गेले होते.
भर दुपारी उन्हाच्या वेळी झोपड्याना अचानक आग लागली. बघता बघता रांगेत असलेल्या १३ झोपड्या आगीच्या तडाख्यात जळून खाक झाल्या. झोपड्यामध्ये कपडे, संसार उपयोगी साहित्य, धान्य, व इतर जळुन खाक झाले.
संबंधित वीटभट्टी कामगार हे कबलापूर (ता. बेळगांव) गावचे रहिवासी असुन ते काही दिवसात काम संपून गावी जाणार होते. यासाठी तिळेल तेलाचे डबे, कडधान्य, कपडे नव्याने खरेदी केली होती हे संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झाले.
घडनेची माहिती मिळताच आमदार सतीश जारकिहोळी या वतीने प्रत्येक कुटुंबाला ५००० रूपयाचा मदत स्वयंपाकासाठी तांदळाची पोती पाठवुन देऊन मदत केली.
यावेळी इदलहोंड ग्राम पंचायतीचे माजी कृष्णा कुंभार, सत्याला पाटील यानी वीटभट्टी कामगाराना धीर देऊन सहकार्य केले.
सिगींनकोपात घडलेल्या घटनेमुळ इदलहोंड परिसरातील नागरीकांतुन हळहळ व्यक्त होत आहे.
एेन उन्हाळ्यात आगी लागण्याचे प्रकार वाढतच आहेत. तेव्हा शेतकरी वर्गाने सतर्क राहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta