खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली.
मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta