खानापूर : भालके खुर्द (ता. खानापूर) येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता विद्युत वाहिनीच्या डीपीतील शॉर्टसर्किटमुळे गवतगंजीला आग लागली. या घटनेत शेतकरी निंगाप्पा सिमानी अळवणी यांच्या घरापाठी मागील परसात असलेल्या चार ट्रॅक्टर गवतगंजीला आग लागून
३५ ते ४० हजाराचे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्ममध्ये सतत ठिणग्या उडत असल्याबाबत हेस्कॉमला वारंवार तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आधीच चाऱ्याच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याचा चार ट्रॅक्टर गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
Belgaum Varta Belgaum Varta