खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळुर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण ता. खानापूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. 20/03/2023 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महादेव गोपाळ मिराशी अध्यक्ष कृषी पत्तीन सोसायटी घोटगाळी होते. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन श्री. गोविंद पाटील अध्यक्ष जय जवान जय किसान संघ खानापूर, श्री. राजु बागेवाडी माजी अध्यक्ष बार असोसिएशन बेळगांव, श्री. कृष्णाजी नारायण शिरोडकर, लेला शुगर खानापूर, श्री. महादेव गोपाळ निराशी अध्यक्ष कृषी पत्तीन सोसायटी घोटगाळी, श्री. संभाजी सटवाप्पा मिराशी, शिक्षणप्रेमी, शिवठाण, श्री. आय एन पाटील, मुख्याध्यापक मराठी प्राथमिक शाळा, शिवठाण यांनी केले. सरस्वती प्रतिमा पुजन श्री. संतोष बळीराम मिराशी यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षक आणि उपस्थित पाहुण्यांनी आपले शुभेच्छा पर विचार मांडले. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल यश हेच शिक्षकाच खर समाधान आसत असे गौरवोद्वार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महादेव गोपाळ मिराशी यांनी काढले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री. गोविंद पाटील अध्यक्ष जय जवान जय किसान संघ खानापूर, श्री. महेश पाटील एल. एम. कापड दुकान, खानापूर आणि श्री. कृष्णाजी नारायण वीर, माजी विद्यार्थी आर्मी देवराई यांनी प्रत्येकी ₹5600/- कीमतीचे ग्रीन बोर्ड शाळेसाठी देणगी म्हणून दिले.
कार्यक्रमाला गावातील शिक्षणप्रेमी, पालक आणि माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. टी. वाय आळवणी सर आणि एस. एस. काजुनेकर मॅडमनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta