
खानापूर (प्रतिनिधी) : येत्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात पोलिस खात्याकडून अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे
खानापूर जांबोटी रोडवरील काजूच्या बागेत हात भट्टीवर दारू काढत असल्याची माहिती मिळताच खानापूर पोलिस स्थानकाचे सी पी आय रामचंद्र नायक यांनी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली छाप्यात टाकाला. छाप्यात ३० लिटर हात भट्टीवरील काजु दारू सापडली. ती दारू जप्त केली.
खानापूर पोलिस स्टेशनात गुन्ह्याची नोंद झाली असुन गुन्हा क्रमांक ७४/ २०२३ कलमानुसार, ३२८ आयपीसी कलम ३२, ३४ कर्नाटक शुल्क उत्पादक कायदा १९६५ प्रमाणे नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या गुन्ह्यात उचवडे (ता. खानापूर) क्राॅसजवळ गोव्याची १७ लिटर दारू विक्री करताना पकडली. १९५५ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta