खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेने नुकताच बैठक घेऊन तालुक्यात स्थानिक उमेदवारालाच येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू. कारण गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर सरकारी कंत्राटदाराना कोणतेच काम दिले नाही. त्यामुळे खानापूर सरकारी कंत्राटदारच्या सदस्यांना उपासमारीची वेळ आली. गेल्या ४० वर्षाच्या काळात अशी वेळ आली नव्हती. खानापूर सरकारी कंत्राटदाराना कामे मिळायची असेल तर स्थानिक उमेदवारालाच प्राध्यान्य देऊ, अशी घोषणा केली.
या भिती पोटी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदार संघटनेवर खोटे आरोप केले असून हे सत्य असेल खानापूर ग्रामदेवता चौराशीच्या देवीसमोर शपथ घेण्यास तयारी दर्शवावी,
असे आवाहन बुधवारी दि. २९ रोजी खानापूर सार्वजनिक विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष यांनीच रस्ते, शाळा दुरूस्ती कामे करून निकृष्ट दर्जाची कामे करून तालुक्याचे प्रचंड नुकसान केले आहे. ते कंत्राटदार संघटनेचे सदस्य नसुन पक्षाच्या नावावर कामे करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
तालुका आमदारानी केवळ आपल्या मर्जीतील कंत्राटदाराना कामे देण्याचा गंगा केला. त्यामुळेच विकास कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची अनेक उदाहरणे बैठकीत दिली.
यावेळी अध्यक्ष सुभाष चलवादी यांनी तालुक्यातील कामाचा दर्जा घालवण्याचे काम खुद्द आमदारानीच केले. त्यामुळे तालुक्याचा विकास झाला नाही. तालुक्यातील रस्ते, सरकारी दवाखान्याचे काम, बसस्थानकाचे काम, गटारी, पुल बांधकाम ही अतिनिकृष्ट दर्जाची झाली आहेत. आशा आमदार तालुक्या बाहेर घालुन स्थानिक उमेदवारालाच आगामी विधानसभा निवडणुकीत संधी देऊ व तालुक्याचा विकास करू, असे सांगितले.
यावेळी सदस्य एम. एम. सावकार यांनी तालुक्यातील विकास कामाना टक्केवारी वाढवून विकास कामाचा दर्जा घालवला. गेल्या ४० वर्षाच्या काळात खानापूरच्या कोणत्याच माजी आमदारानी अशी अवस्था केली नव्हती. तेव्हा खानापूर तालुक्याला स्थानिक उमेदवारालाच आमदार करू व तालुक्यातील विकास घडवून आणू असे सांगितले.
गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर तालुक्यातील कंत्राटदाराना डावलून तालुक्या बाहेरील कंत्राटदाराना तालुक्याच्या आमदारानी तालुक्यातील कंत्राटदारांच्यावर अन्याय केला. याचा बदला काढण्यासाठी तालुक्याच्या स्थानिक उमेदवारालाच आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू, अशी चर्चा रविवारी येथील शिवस्मारक सभागृहात आयोजित खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष चलवादी होते.
तर बैठकीला उपाध्यक्ष लक्ष्मण बोटेकर, गौरवाध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन मुतगी, खजिनदार विष्णू बेळगावकर, सदस्य रमेश सिंगनाथ, नारायण खानापूरी, एम एम सावकार, प्रकाश गावडे व इतर सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक एम एम सावकार यांनी केले.
यावेळी कंत्राटदार उपस्थित होते.
आभार खजिनदार विष्णू बेळगावकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta