Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूर विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कडक : निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रद

Spread the love

 

खानापूर : कर्नाटक विधानसभा निवडणूकीची तारीख निवडणुक आयोगाने जाहीर केल्याने खानापूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकारी (Ro) अनुराधा वस्त्रद यांनी आज तहसीलदार कचेरीत पत्रकार परिषद घेऊन खानापूर विधानसभा क्षेत्रात केलेली पुर्व तयारी व निवडणुकीत राजकीय पक्षांना लागु असलेली आचारसंहिता याबद्दल माहिती दिली.

यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड पोलीस ईन्सपेक्टर रामचंद्र नाईक, ता. पंचायतचे EO ईरण्णगौडा एन व नंदगड पोलीस ठाण्याचे ए एस आय मोकाशी व तहसीलदार कचेरीतील अधिकारी हिरेमठ उपस्थित होते. प्रथमता सर्वांचे स्वागत तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले व पत्रकार परिषदेचा उद्देश सांगितला.

त्यानंतर निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी सांगितले की, आजपासून आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्ष व उमेदवार यांनी कायद्याचे पालन करावेत, निवडणुक प्रचारादरम्यान कोणतीही काही सभा, गाडी परवानगी, ईतर काही परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली असुन त्याठिकाणी ताबडतोब परवानगी देण्यात येईल, व उमेदवारांना आपला केलेला खर्च दररोजच्या दररोज त्याठिकाणी सादर करायचा असून उमेदवारांना 40 लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे,

तालुक्यात 6 ठिकाण अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत त्यात खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी खानापूर, लोंढा, देवलती, तर नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेडरहट्टी, बीडी, गंदिगवाड अशी अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून जाहीर करण्यात आली आहेत तर तालुक्यात 22 संवेदनशील ठिकाणे म्हणून जाहीर केली असल्याचे सांगण्यात आले,

तालूक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी 12 टीम तयार करण्यात आल्या असून तीन शिफ्टमध्ये दिवसरात्र ते कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले, खानापूर तालुका अतिशय जंगल प्रदेश असल्याने 19 ठिकाणी नेटवर्क बरोबर नाही त्या ठिकाणी जिओ कंपनीची मदत घेण्यात आली असून 14 ठिकाणी नेटवर्क कामच करत नाही अशा ठिकाणी वाकी टॉकीटॉकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुक्यातील एकूण मतदान व मतदानाची व्यवस्था

खानापूर तालुक्यात एकूण मतदान केंद्र 255 असून एकूण मतदान 2 लाख 8 हजार 647 असून त्यात पुरुष मतदान 1 लाख 777 तर महिला मतदान 1 लाख 8 हजार 39 तर जेंडर मतदान 12 आहेत, ज्यांची मतदान यादीत नावे आली नाहीत त्यांनी 6 नंबर फॉर्म भरून दहा एप्रिलच्या आत त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याकडे द्यायचे आहेत किंवा ऑनलाईन फॉर्म भरायची सुद्धा व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले. वयोवृद्ध नागरिकांना व अपंग व्यक्तींना व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली असून ज्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येता येणार नाही अशा व्यक्तींच्यासाठी घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *