खानापूर (प्रतिनिधी) : तोलगी (ता. खानापूर) गावातील परिस्थितीने गरीब असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या 8 बकऱ्यांचा विषारी गवत खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. ३१ रोजी घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तोलगी (ता. खानापूर) शेतकरी रूद्राप्पा रंगण्णावर व बरम्मव्वा करप्पा गुंजीकर या गरीब शेतकरी कुटुंबाची परिस्थिती नाजुक आहे. बकरी पाळून ते जीवन जगत होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे शिवारात बकरी चरावयास गेली असता बकऱ्यांनी विषारी गवत खाल्याने रूद्राप्पा रंगण्णावर यांची चार बकरी व बरम्मव्वा करप्पा गुंजीकर यांची चार बकरी अशी एकूण आठ बकरी विषारी गवत खाल्ल्याने जागीच मृत्युमुखी पडली. त्यात दोन्ही शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले.
घटनेची माहिती समजताच नेगीला योगी सुरक्षा रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष बसनगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. तालुका शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक महादेव गोवरी, जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष मल्लांना भांडी व जिल्हा सचिव पदाची चिक्कार व शहर नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta