Tuesday , December 9 2025
Breaking News

लिंगनमठजवळ चांदी, सोन्याची अवैद्य वाहतूक करणाऱ्याला अटक; नंदगड पोलिसांची कारवाई

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या लिंगनमठ गावाजवळ संशयास्पद सोन्या, चांदीची वाहतूक करत असल्याची माहिती मंगळवारी दि. ४ रोजी दुपारी १२ वाजता नंदगड पोलिसांनी मिळताच नंदगड पोलिस स्थानकाचे पोलिस अधिक्षक बसवराज लमाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगनमठ जवळ हल्याळ भागातून कक्केरीकडे जाणाऱ्या केए ६३ टी सी ०८४ /१ ए के क्रमांकाच्या कारमधून कोणत्याही कागदपत्राची पूर्तता न करता ४० लाख ३३ हजार ७२० रूपये किमतीच्या सोन्या चांदीचा ऐवज सापडला. या प्रकरणी कल्याण येथील धर्मराज हणमंत कुट्रे व १२ लाखाची कार वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली.
यावेळी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगड पोलिस स्थानकाचे सी पी आय बसवराज लमाणी व पोलिस कर्मचारी श्री. बेळवडी आदींनी ही कारवाई केली.
त्याचबरोबर कलम ९८ कर्नाटक पोलिस अधिनियम १९६३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *