खानापूर : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्व पक्षांकडून उमेदवारी निवडीसाठी चाचपणी सुरू आहे. काँग्रेसने डॉ. अंजली निंबाळकर यांची तर निजदमधून नासीर बागवान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देशातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. 2018 ला थोडक्या मतांनी पराभूत झालेले विठ्ठल हलगेकर हे सध्या प्रमुख दावेदार आहेत तर डॉ. सोनाली सरनोबत, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, संजय कुबल व सध्या भाजपात आयाराम अरविंद पाटील हे देखिल आपल्या उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या उमेदवारीसाठी दिल्ली दरबारी कंबरकसली आहेत.
काँग्रेसने अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. महिला उमेदवाराच्या विरोधात डॉ. महिला असा प्रयोग भाजपा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेंगळुरू व दिल्ली दरबारी जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. भाजपमध्ये महिला विरोधात महिला देण्याचा निर्णय झाल्यास खानापूर भाजपाची उमेदवारी डॉ. सोनाली सरनोबत यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta