खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून जनता पार्टी कर्नाटक पक्षातून गंगवाळी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शंकर कुरूमकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती पक्षाचे प्रधान कार्यदर्शी नागेश यांनी खानापूरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना उमेदवार शंकर कुरूमकर म्हणाले की, खानापूर तालुक्यात इतर पक्षा प्रमाणेच जनता पार्टी कर्नाटक पक्षाचे जुने कार्यकर्ते गेल्या ४७ वर्षापासून आहेत.
कर्नाटकात मागील तीन वेळा विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन केलेल्या या पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभे करून निवडणुक लढवण्याचा निर्धार केला आहे.
जनता पार्टी कर्नाटक पक्षाला नांगरधारी शेतकरी हे चिन्ह असुन खानापूर तालुक्यातुन या पक्षाचे उमेदवार शंकर कुरूमकर हे असुन शंकर कुरूमकर हे युवा शक्तीचे प्रेरणास्थान आहे.
स्वर्गीय रामकृष्ण हेगडे यांना मानणारे अनेक मतदार खानापूर तालुक्यात आहेत.
कै. रामकृष्ण हेगडे यांच्या काळात झालेल्या योजनाबद्धल खानापूर तालुक्यातील जनतेतून जागृती करून जनता पार्टी कर्नाटक पक्षाला निवडणुन आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत शंकर कुरूमकर यांनी बोलुन दाखविले.
Belgaum Varta Belgaum Varta