खानापूर (प्रतिनिधी) : यंदा २२ एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंतीला पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीला निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने यंदाच्या शिवजयंतीला आचारसंहितेमुळे मर्यादा येणार आहेत.
त्यामुळे खानापूरातील चित्ररथ मिरवणुकीला सोमवारी दि. २२ मे ही तारीख सोयीची होणार आहे, असे मत युवा नेते पंडित ओगले यांनी मंगळवारी दि. ११ एप्रिल रोजी खानापूर शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्ष्मी मंदिर येथे बोलविलेल्या बैठकीत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले की, यंदा २२ एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव आहे.
परंतु शिवजयंती निमित्ताने चित्ररथ मिरवणुकीला निवडणूकीच्या आचारसंहिता मुळे शासनाची परवानगी नाही. यावेळी शिवजयंती साजरी करता येईल मात्र मिरवणुकीला परवानगी नाही. तेव्हा २१ मे रोजी खानापूर शहरातील तसेच शहराशेजारी असलेल्या करंबळ, हलकर्णी, रूमेवाडी आदी शिवजयंती उत्सव मंडळाच्या चित्ररथाला सहभागी होता येईल.
यावेळी विजेत्या शिवजयंती उत्सव मंडळा प्रथम, व्दितीय, तृतीय अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी सांगण्यात आली.
बैठकीला लक्ष्मी मंदिर, देसाई गल्ली, गुरव गल्ली, निंगापूर गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी पंडित ओगले, प्रकाश देशपांडे, राजू गुरव, गुंडू तोपिनकट्टी, राहुल सावंत, आपण यरमाळकर, श्रीकांत मोटर, किरण तुडवेकर, संदीप अंगडी, सोमनाथ गुरव, पिंटू यळ्ळूरकर, आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta