खानापूर (प्रतिनिधी) : येत्या १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून खानापूर तालुक्यातुन आम आदमी राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे सचीव शिवाजी गुंजीकर यांनी पक्षाच्या कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, जेडीएस तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आदींनी उमेदवारी जाहीर केली आहे.
आम आदमी पक्ष ही राष्ट्रीय पक्ष आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम आदमी पक्षाने खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक खेड्यात समस्या नाही वाचा फोडली व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. तर केजरीवाल यांच्या दिल्लीतील विकास योजना आम आदमी पक्षाचे खानापूर तालुक्यातील लोकांच्या आकर्षण आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार म्हणून आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्या बरोबर इतर दोन तीन अर्ज आलेले आहेत.
तरी सध्या भाजप, काँग्रेस, म. ए. समिती मधुन कोणी असंतुष्ट नेते असतील तर त्यांना आम आदमी पक्षात पण उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे सचिव शिवाजी गुंजीकर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी बैठकीला कबीर शेख, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, प्रभाकर, पाटील, चंद्रकांत मेदार,करीयप्पा बेकिनकेरी, संभाजी पाटील, पुंडलिक चौगुले, नागाच्या चौगुले, इम्रान अत्तार, जावेद देशनुर, मंजुनाथ बागेवाडी, मोहन मुळीक, रमेश कौंदलकर, मनोहर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta