खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवाराचा विचार केला नाही.
गेली कित्येक वर्षे काँग्रेस पक्षात कार्य केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून मागील २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मात्र २०२३ सालच्या निवडणुकीत स्थानिक व एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला उमेदवारी देऊ शकले नाही.
वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून सुध्दा परराज्यातील उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याने मी काँग्रेसचे खानापूर तालुका युवा अध्यक्ष इरफान तालिकोटी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून खानापूर मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असुन गुरूवारी दि. १३ रोजी आपल्या कार्यकर्त्यासह रेल्वे स्टेशन रोड येथे कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते वाय. बी. गुप्पीत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी बोलताना नेते इरफान तालिकोटी म्हणाले की, काँग्रेस पक्षात राहुन तालुक्यातील अनेक विकास कामे केली आहेत,. गोरगरीबांना सरकारी योजनाचा लाभ करून दिला. अनेक गावात क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहित केले.
हिंदू, मुसलमान असा भेदभाव न करता हजारो जनतेच्या मनात घर केले. तालुक्यातील जवळपास ३० हजार मतदार माझ्या पाठीशी आहेत. म्हणून मी निवडणुक लढविण्याचा विचार करत आहे.
यावेळी युवा काँग्रेस नेते इरफान तालिकोटी, वाय. बी. गुप्पीत, अब्दुलखान गुप्पीत, एम ए इनामदार, नारायण मासेकर, बाळू पाटील, मुगूटसाब दोडमनी, बाबाजी देसाई, अतिक नंदगडी, अमर गुरव, नागराज तलवार आदी कार्य कर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta