खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे पक्षा पक्षात एकमेकावर आरोप प्रत्यारोप बरोबरच विरोध कसा करता येईल याची संधी पक्षाचे नेते पहात असतात. असाच प्रकार खानापूर मतदार संघातून पाहायला मिळाला.
शुक्रवारी दि. १४ एप्रिल रोजी काँग्रेसच्या उमेदवाराकडून निवडणूक अधिकारी वर्गाकडे तहसील कार्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर भाजपचे कार्यालय आहे. याची खानापूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना विसर पडला आहे की काय? अशी तक्रार निवडणूक अधिकारी वर्गाकडे काँग्रेसच्या उमेदवारांनी केली. त्यांचे म्हणणे आहे की, दि. १३ एप्रिलपासून नोटिफिकेशन चालु आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयापासुन १०० मीटर अंतराच्या आत कोणत्याही पक्षाचे कार्यालय थाटात येत नाही. परंतु खानापूर मतदारसंघातील खानापूर निवडणूक अधिकारी कार्यालयापासून १०० मीटर अंतराच्याआत भाजपचे कार्यालय आहे.
तेव्हा निवडणूक अधिकारी वर्गाला याची विसर पडला आहे की, भाजप पक्षाची भिती वाटते म्हणून नियम लागू केले नाहीत, अशी तक्रार काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक अधिकारी वर्गाकडे केली.
आता निवडणूक अधिकारी भाजपा कार्यालयासंदर्भात कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta