खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील हे उद्या सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी कळविले.
याबाबत बोलताना गोपाळ देसाई म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी झाल्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या पाया खालची वाळू घसरली आहे. मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यासाठी शक्ती प्रदर्शनाने अर्ज भरण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ठीक दहा वाजता खानापूरची ग्रामदेवता श्री चौराशी देवीचे आशीर्वाद घेऊन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. बाजारपेठ, घाडी गल्ली, गुरव गल्ली, ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली, स्टेशन रोड हुतात्मा स्मारक मार्गे शिवस्मारकात दाखल होणार आहे तरी तालुक्यातील समस्त समिती प्रेमी मराठी भाषिक जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta