
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदार संघात पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खानापूर शहरात शक्तिप्रदर्शन होत आहे.
मात्र बुधवारी दि. १९ रोजी भाजपचे उमेदवार विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले.
यावेळी मिरवणुकीची सुरूवात जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी जवळपास १५ हजार नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी खानापूरातील गणेशाचे दर्शन घेऊन जांबोटी क्रॉसवरील बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी ढोलताशे, झांजपथक, धनगरवाद्याने मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.
यावेळी मिरवणुकीत मंत्री शशिकला जोल्ले, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रसाद सावंत यांच्या पत्नी व भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सौ. सुलक्षणा सावंत, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर, धनश्री सरदेसाई, राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकट्टीसह तालुका भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खानापूर जांबोटी क्रॉसवरील बसवेश्वर चौकात जनसागर लुटला होता. आतापर्यंतच्या शक्ती प्रदर्शनात इतका जनसमुदाय कधीच लुटला नव्हता.
त्यामुळे भाजपच्या विठ्ठलराव हलगेकर यांच्या विजयाची खात्री दिसुन आली.
यावेळी पोलिस फाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला. मिरवणुकीला घोडा, बैलगाडी आणण्यात आला होता. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून बैलगाडीतून मिरवणुकीला प्रारंभ झाला. बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालुन मिरवणूक ग्रामदैवत चौराशी मंदिरकडे जाऊन देवीचे दर्शन घेऊन, मिरवणूक बाजारपेठेतून, देसाई गल्ली, स्टेशन रोडवरून शिवस्मारकात आली. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसीलदार कार्यालयात आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला.
Belgaum Varta Belgaum Varta