खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका काँग्रेसमध्ये अखेर दोन गट होऊन दुसऱ्या गटातून काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष इरफान तालिकोटी यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत गुरूवारी दि. २० रोजी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारीचा अर्ज निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे दाखल केला.
इरफान तालिकोटी हे काँग्रेसचे जुने नेते. त्यांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी सतत प्रयत्न केेले. खेडोपाडी काँग्रेस कार्यकर्ते उभारले. ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या सोबत काम केेले.
मात्र पक्षात नवीन आलेल्याना उमेदवारी दिली. ज्येष्ठ नेत्याना विश्वासात न घेताच उमेदवारी दिली. त्यामुळेच खानापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली बंडखोरी करत उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे दाखल केला.
प्रारंभी आपल्या समर्थकासह खानापूर शहरातील बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करून आपल्या नेते मंडळीसह कार्यकर्त्यांसह सकाळी खानापूरातील गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन, ग्रामदैवत चौराशी मंदिर, त्यानंतर शिवस्मारक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.
यावेळी हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta