
खानापूर : गंदिगवाड पंचायतीचे माजी अध्यक्ष व पिकेपीएसचे संचालक श्री. उदय हिरेमठ यांनी आज आमदार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, मॅनॉरिटी अध्यक्ष अन्वर बागवान हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना उदय हिरेमठ म्हणाले की, आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी गंदिगवाडमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे राबविली आहेत. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी आहोत.
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अखलाख सनदी हे सुद्धा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यावेळी बोलताना आपला सनदी म्हणाले की, हिरेमुन्नोळी हे गाव यावेळी शंभर टक्के अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही आमची सर्व ताकत आमदार अंजलीताईंच्या पाठीमागे उभी केली असून संपूर्ण पूर्व भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खानापूर तालुक्यात यावेळी प्रचंड बहुमताने विजयी होतील यातील मात्र शंका नाही.
Belgaum Varta Belgaum Varta