खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील रूमेवाडी क्राॅसवरील कर्नाटक समग्र अभिवृद्धी संघाच्यावतीने गरीब महिलांना शिवणकाम प्रशिक्षण निमित्ताने साहित्याचे वाटप अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी दि. २२ रोजी करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप धनश्री सरदेसाई, खानापूर भाजप प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक पुजा पाटील यांनी केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना धनश्री सरदेसाई म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला साठी अनेक सवलती उपलब्ध केल्या आहेत.
नोकरीच्या मागेन लागता, महिलानी शिवणकाम करून संसाराला हातभार लावता येतो. याशिवाय डिझाईनमध्ये ही आपले करिअर घडू शकता. तेव्हा शिवणकाम प्रशिक्षणाचे चांगले मार्गदर्शन घेऊन यशस्वी व्हा, असे आवाहन केले.
यावेळी प्रशिक्षण महिलाना शिवणकाम साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्या श्रीमती विद्या यानी माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमला प्रशिक्षण महिला विद्या पाटील, लक्ष्मी उपाशी, श्रृती हजारे, सविता नाईक, लक्ष्मी हेळवी, कावेरी गस्ती, विद्या कांबळे, आदी महिला उपस्थित होत्या. विद्या मॅडम यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta