
खानापूर : कक्केरी-लिंगनमठ परिसरातील गावात पाच वर्षात जलसिंचन, वैद्यकीय सेवा, रस्ते, शाळा यासह इतर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यात विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक वेळा विकासकामात अडथळे आणलेले तुम्हाला माहीत आहे. विरोधाला न जुमानता विकासाला प्राधान्यावर भर दिलेला आहे. कक्केरी, लिंगनमठ परिसरातील गावांचा कायापालट करण्याचा माझा मानस आहे. यासाठी येत्या निवडणुकीत या भागातील मतदारांनी मला भरघोस पाठिंबा देऊन विजयी करावे, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी लिंगनमठ, कक्केरी, परिसरातील प्रचार दौऱ्यावेळी कोपरा सभेत केले. यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी आपल्या प्रचारादरम्यान कक्केरी, लिंगनमठ गावात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. गेल्या पाच वर्षात या भागात केलेल्या विकासकामांची त्यांनी माहिती दिली. यानंतर गावोगावी कोपरा सभा घेत मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. लिंगनमठ, कक्केरी परिसरातील कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष रियाज पटेल, विरेश रपन्नावर, बसवराज विरापूर, कार्तिक अंबडगट्टी, मंजू विरापूर, गिरीश निलजकर, हरिश निलजकर, शिवप्रसाद अंग्रोळी, बसवराज कोरीश्वाड, सोमशंकर केरकर, कार्तिक हुलबत्ते, श्रवण कुरबर, प्रवीण विरप्र, जोतिबा, केरकर, सतीश गावीत, निलेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार अंजली निंबाळकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta