खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबली.
खानापूर मतदार संघाच्या निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रे यांनी खानापूर तालुक्यातील मतदारांना आवाहन करताना म्हणाल्या की, सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी ६वाजता प्रचार करण्याची वेळ संपली. आता माईकव्दारे प्रचार करता येत नाही. शहरासह तालुक्यातील मद्यविक्रीला कायदेशीर बंदी आहे. यासाठी अबकारी खात्याला यावर लक्ष देऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कोणत्या ही उमेदवाराचा प्रचार करता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. येत्या ४८ तासात उमेदवाराचा प्रचार करता येणार नाही. मतदारांना पैसे वाटप करणे, कोणत्याही प्रकारची आमिषे दाखविणे यावर कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
तेव्हा मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या अमिना बळी पडू नये.
बुधवारी दि. १० रोजी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असुन सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया थांबणार आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील मतदारांनी आपले बहुमोल मत घालून मतदान करा, असे आवाहन निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्र यानी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta