तालुक्यातील जनतेतून चर्चा
खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावली. तसे जनतेचे लक्ष निवडणुकीच्या निकालाने लागून राहिले आहे. उद्या शनिवारी दि. १३ रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराचा निकाल लागणार.
खानापूर मतदार संघातून कोण निवडून येणार यावर तर्क वितर्क तालुक्यातील खेडोपाडी तसेच खानापूर शहरात मोठ्या उत्साहाने चर्चा केली जात आहे.
खानापूर तालुका हा समितीचा बाल्ले किला असला तरी खानापूर मतदार संघात राष्ट्रीय पक्षाने आपले पाऊल भक्कम केले आहे.
यंदा समितीचा एकच उमेदवार असल्याने तालुक्यातील जनतेतून समितीच्या उमेदवाराकडे विजयाच्या अपक्षेने पाहिले जाते.
मात्र सहा जिल्हा पंचायती क्षेत्रात चार जिल्हा पंचायती म्हणजेच गर्लगुंजी, जांबोटी, नंदगड व लोंढा या तेवढ्याच मराठी भाषिक जिल्हा पंचायती आहेत. उर्वरित दोन जिल्हा पंचायती म्हणजे पारिश्वाड व कक्षेची या दोन जिल्हा पंचायती निव्वळ कन्नड भाषिक आहेत. येथे समितीला मताची अपेक्षा करणे कठीण आहे.
मात्र राष्ट्रीय पक्ष भाजप, काँग्रेस, जेडीएस या तिन्ही पक्षाना सहा ही जिल्हा पंचायती तुन मताची अपेक्षा राहणार आहेत.
या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारात भाजपचे पारडे जड आहे.
भाजपचे नेते प्रत्येक जिल्हा पंचायती तुन विखुरलेले आहेत.
त्या शिवाय यंदा भाजप मध्ये बंडखोरी चा वास नाही. त्यामुळे एकजुटीने मतदान झाल्याने भाजपला विक्रमी मताधिक्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विजय भाजपचा आहे. अशी चर्चा खानापूर तालुक्यातील जनतेतून होताना दिसत आहे.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार याच्या विरोधात बंड फुकारल्याने यंदा काँग्रेस मताचा धक्का बसणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मताचा आकडा घसरला जाणार आहे.
जेडीएस पक्षात मात्र नेत्याच्या नाराजीचा परिणाम मतदानावर होताना दिसत आहे. परिणाम जेडीएस ला मताचा अाकडा पार करणे डोकेदुखी होणार आहे.
यंदा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार सुध्दा तालुक्यातील जनतेच्या घरा पर्यंत पोहोचले आहेत. तसेच अपक्ष उमेदवारानी ही मतांसाठी तालुका पिंजून काढला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवाराना मताची अपेक्षा आहे.
या १३ उमेदवारातुन कुणाचे भविष्य उजाळणार हे शनिवारी दि १३ रोजी दुपारपर्यंत तालुक्यातील जनतेच्या कानापर्यंत पोहचणार. तेव्हा कुणाचा गुलाल उधळणार. हे उद्याच स्पष्ट होणार. जनतेच्या मनात मात्र विजयाची हुरहुर लागुन आहे.
Belgaum Varta Belgaum Varta