Monday , September 21 2026
Breaking News

सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ

Spread the love

 

परभणी जिल्ह्यातील घटना

परभणी : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टँक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं भाऊचा तांडा शिवारात शोककळा पसरली आहे. मृत झालेल्या पाच कामगारांमध्ये शेख सादेक (वय 55), शेख जुनेद (वय 32) शेख शारोक (वय 28), शेख नवीद (वय 28), शेख फेरोज (वय 29) यांचा समावेश आहे. अत्यवस्थ असलेल्या एका कामगाराला परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत पाचही कामगारांचे मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *