खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी दि. १३ रोजी होणार आहे. यासंदर्भात खानापूर मतदार संघात खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दि. १३ रोजी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत १४४ अन्वये दारूबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तेव्हा रॅली, प्रतिकृती जाळणे, लाऊडस्पीकरचा वापर करणे सक्त मनाई आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेश पोलीस खात्याकडून देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta