खानापूर : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक संपताच आता लक्ष राहिले ते आता गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुक.
खानापूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. त्यामुळे भाजपचा आमदार खानापूर तालुक्याला मिळाला.
आता तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. ते
गेल्या दोन वर्षांपासून तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुका होणार होणार म्हणून दोन वर्षे गेली. अद्याप निवडणुका झाल्या नाहीत. त्याच घाईत विधानसभा निवडणूका पार पडल्या. मात्र तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुका झाल्या नाहीत.
आता खानापूरात भाजप पक्षाने विधानसभा निवडणुकीत ९१७७५ मते घेऊन विजय मिळविला. त्यामुळे खानापूर मतदार संघात भाजपचे बळ वाढले.
आता येणाऱ्या खानापूर तालुक्यातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकेत भाजपचे लक्ष लागून आहे. आमदारकी मिळविण्यासाठी ९१७७५ मतांचा आकडा गाठला आहे. त्यामुळे भाजपला मतदारावर मोठा विश्वास बसला आहे.
खानापूर तालुक्यात तालुका पंचायतीवर २० सदस्य तर जिल्हा पंचायतीवर ६ सदस्य अशी संख्या आहे.
खरे पाहता खानापूर तालुक्यात ८० टक्के मराठी भाषिक मतदार तर २० टक्के मतदार हे कन्नड भाषिक मतदार आहेत.
या सहा जिल्हा पंचायतीमध्ये गर्लगुंजी, जांबोटी, लोंढा व नंदगड या चार जिल्हा पंचायतीमध्ये मराठी भाषिक आहेत. तर राहिलेल्या पारिश्वाड व कक्केरी जिल्हा पंचायतीवर कन्नड भाषिक आहेत.
विधानसभा निवडणुकीचा अंदाज घेता सहा जिल्हा पंचायतीवर तसेच २० तालुका पंचायतीवर आता भाजपची चांगली पक्कड बसली आहे.
या संधीचा फायदा घेत सर्वच तालुका पंचायतीवर व जिल्हा पंचायतीवर भाजपचा तगडे उमेदवार उभारले व पक्षात बंडखोरी न करता भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून ही निवडणूक लढवली तर खानापूर तालुक्यात भाजपचा पुन्हा एकदा इतिहास होण्याचा संकेत आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यात भाजपचे बळ वाढत आहे. गावोगावी भाजपचे कार्यकर्ते वाढत आहे. याचाच फायदा भाजपचे उमेदवार घेतील भविष्यात होणाऱ्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीवर भाजपचा पुन्हा एकदा विजय होईल. अशी अशा आहे.
तेव्हा तालुका भाजपचे अध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा भाजपची ताकद लावली तर खानापूर तालुक्यातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविण्यास काहीच कठीण नाही.