Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूरात कृषी खात्याच्या सवलतीच्या दरातील बी बियाणाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते वाटप

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात सध्या पेरणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील बी बियाणाच्या वाटपाच्या प्रतिक्षेत गेल्या कित्येक दिवसापासुन होते.
यंदाच्या कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणाऱ्या बी बियाणाचे वाटप नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते गुरूवारी दि. २५ रोजी जांबोटी क्राॅसवरील तालुका कृषी खात्याच्या कार्यालयात करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात इंटान, अभिलाषा व इतर बियाणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडून इंटान भात व अभिलाषा बियाणाच्या पोत्यासाठी २०० रूपये सबसीडी असुन ८३१ रूपये २५ किलो वजन बियाणाचे पोते घेऊन जाऊ शकतात. तेव्हा शेतकरी वर्गाकडून जास्त रक्कमेची अपेक्षा अधिकारी करत असतील तर संपर्क करावे.
तसेच पिकावरील रोगासाठी तांबेरा रोगासाठी औषधाची सोय कृषी खात्याकडून केली जाते. याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
खानापूर कृषी अधिकारी कित्येक वर्षे एकाच ठिकाणी.
सरकारच्या नियमानुसार तीन वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. मात्र खानापूर कृषी खात्याचे अधिकारी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाची अधिकारी वर्गाला किमत नाही आहे. याचा त्रास शेतकरी वर्गाला होता. शेतकऱ्यांच्या समस्येकडे हे अधिकारी दुर्लक्ष करतात. अशी तक्रार शेतकरी वर्गाकडून होत आहे.
तेव्हा नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागणार अशी चर्चा शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *