बेळगाव (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले वाचनालयाचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे खजिनदार सुरेश पाटील हे होते. वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष हभप दशरथ पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. प्रारंभी दिलीप पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच मारुती हसनेकर आणि हणमंत पाटील यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शुभम पाटील, कल्लाप्पा पाटील यांची भाषणे झाली. शटूप्पा यसगुंडे यांनी कार्यकमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रवीण पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta