Sunday , December 14 2025
Breaking News

निट्टूरजवळ झालेल्या अपघातात अनगोळचा युवक ठार

Spread the love

 

खानापूर : निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५, दोघेही रा. बाबली गल्ली, अनगोळ- बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, योगेश हा अनगोळमधील सार्थक फोटो स्टुडिओचा मालक असून तो त्यांच्या नातेवाईकासह बेकवाड येथील लग्नाला गेला होता. बेळगावला परततांना निट्टूरजवळ खानापूर-बेळगाव महामार्गावर त्यांच्या दुचाकीची कठड्याला धडक बसली. दुचाकी भरधाव होती. त्यामुळे योगेश याच्या डोकीला जबर मार बसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जखमीला तात्काळ बेळगाव येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवारी सुवर्णसौध नजीक धरणे आंदोलन

Spread the love  बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *