खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे आज 30 मे रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. यावेळी १ जून रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा असे आवाहन तालुका वासियांना करण्यात आले. १ जून रोजी हिंडलगा बेळगाव येथे सकाळी आठ वाजता हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, गोपाळराव पाटील, जगन्नाथ देसाई, शशिकांत सावंत, विठ्ठल सडेकर, कृष्णा कुंभार, म्हात्रू धाबाले, निरंजन सरदेसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta