Wednesday , December 10 2025
Breaking News

१९ रोजी खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपुष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येत्या १९ जुन रोजी जाहीर होणार आहे.
येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. १९ रोजी होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे खानापूरात तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्याचे लक्ष आरक्षणाचे लागुन आहे.
खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सदस्यातून अडीच वर्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *