खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उद्या मंगळवार दि. 6 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
खानापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही तिथी प्रमाणे होत आहे.
यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दि. 6 रोजी होत आहे.
या सोहळ्याला खानापूर शहरासह तालुक्यातील सर्व धारकरी व शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खानापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
यानिमित्ताने मंगळवारी सकाळी ठिक 6 वाजता विधिवत पुजा करून अभिषेक करण्यात येणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता महाराजांची पालखी शिवस्मारक येथून शहरातील देव दर्शनासाठी निघणार आहे. त्यानंतर मलप्रभा नदी घाटावरील महादेव मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
यावेळी पालखी सोहळ्यात श्री हरे कृष्ण भजनी मंडळ भाग घेणार तसेच यावेळी लाटी, काठीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta