आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर
खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर तालगुपा हा राज्यमार्ग आहे. असे एकूण सात राज्यमार्ग असुन खानापूर तालगुपा हा एक राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाचा महामार्गात समाविष्ठ करावा,
अशा मागणीचे निवेदन नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बेंगलोर येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेऊन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालगुपा या राज्यमार्गाचा शुभारंभ खानापूरातुन होतो. या राज्यमार्गावरून अवजड वाहतुक केली जाते. या रस्त्यापैकी जवळपास ३० किलोमीटर अंतराचा राज्यमार्ग हा खानापूर तालुक्यातुन जातो. त्यामुळे अनेक प्रमुख गावांशी राज्यमार्ग जोडला आहे. यासाठी राज्यमार्गाचा विकास होण्यासाठी खानापूर- तालगुपा हा राज्य मार्ग महामार्गात समाविष्ठ करावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बेंगलोर येथे राज्याचे बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांना दिले.
प्रारंभी आम. विठ्ठलराव हलगेकर यांनी मंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, खानापूर तालुक्यातुन जाणाऱ्या खानापूर -तालगुपा राज्यमार्गाचा महामार्गात रूपांतर व्हावे असे निवेदन दिले.
यावेळी लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संचालक चांगाप्पा निलजकर, ऍड. सुरेश भोसले, शाम घाटगे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta