
खानापूर : हवामान खात्याने येत्या काही दिवसात जोरदार व वादळी पावसाची शक्यता नोंदविली आहे. जर मुसळधार वादळी पावसाने नदी नाल्याना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी पूरस्थिती निर्माण होऊन त्यावर सामना करण्यासाठी व खबरदारीचा उपाय करण्यासाठी तालुका अधिकाऱ्यांनी सतर्क राहाण्याची सुचना बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवतार यांनी शुक्रवारी दि. ९ रोजी तालुका पंचायतीच्या सभागृहात आयोजित तालुका अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. यावेळी व्यासपीठावर तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी श्री. इरनगौडर होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुका अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. अशा तालुक्यात पावसाचा सतत जोर असतो. नदी नाल्याना पूर येऊन नदी नाले ओसंडून वाहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते बंद होऊन पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तालुका नोडल अधिकार्याचा नियुक्ती करणार असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाराव्दारे करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी बैठकीला तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत खानापूर तालुक्यातील अनेक तालुका अधिकारी हे बेळगाव शहरात मुक्कामाला असतात. ते सकाळी १० ते ११वाजता खानापूरात येतात व सायंकाळी ५ वाजता बेळगावला जातात. यावर कुणाचेच बंधन नाही. त्यामुळे पुर स्थितीत हे अधिकारी काय करणार. पूरस्थिती काही वेळ सांगुन येत नाही. तेव्हा तालुका अधिकार्यांनी खानापूरात राहणे महत्वाचे आहे. पण लक्ष कोण देते? असा सवाल निर्माण झाला आहे.
या बैठकीत इतर विषयावर चर्चा करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta