

खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील जंगल भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने झाडे कोसळून जवळपास १२ विद्युत खांब जमिनदोस्त झाले. त्यामुळे जांबोटी भागातील जवळपास २७ खेड्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
यावेळी हेस्काॅमच्या कार्यनिर्वाहक अधिकारी कल्पना तिरवीर यांनी बोलताना सांगितले की, खानापूर तालुक्यातील जंगल भागात नेहमी वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. त्यामुळे विद्युत खांब पडून हेस्काॅम खात्याचे ओतानात नुकसान होत असते.
शनिवारीही तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी भागात विद्युत खांब पडल्याने समस्या निर्माण झाली.
त्यामुळे या भागातील जवळपास २७ खेड्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रविवारी साप्ताहिक सुट्टी असून सुध्दा सर्वच हेस्काॅम खात्याचे कर्मचारी कामाला लागले.
जंगल भागात पुन्हा विद्युत खांब उभे करण्यासाठी रविवारी जांबोटी भागातील हेस्काॅम खात्याच्या कर्मचारी वर्गाने काम हाती घेतले आहे. तसेच विद्युत खांबावरील ताराही ओढण्याचे काम करावयाचे आहे.
अनेक गावांना जोडणाऱ्या विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बरेच दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे बऱ्याच गावांना वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांतून नाराजी पसरली आहे. तेव्हा लवकरात लवकर जांबोटी भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्काॅम खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta