खानापूर : वृध्दाच्या डोकीत घाव घालून खून केल्याची घटना नंदगड पोलीस स्थानक हद्दीतील भुत्तेवाडी येथे घडली आहे.
लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) असे डोकीत घाव घालून खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
भुत्तेवाडी गावात सुतार काम करणाऱ्या वृद्धाचा खून केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
लक्ष्मण यल्लाप्पा सुतार हे मागील अनेक वर्षापासून गावात सुतार काम करत होते. काल रात्री डोकीत घाव घालून त्यांचा खून करण्यात आला आहे. डोक्यात दगड अथवा एखाद्या शस्त्राने प्रहार केल्याने वृद्धाचे डोके फुटून रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. हा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला गेला याचे कारण अद्याप कळालेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta