खानापूर : राज्यात काँग्रेस सरकार येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उर्जामंत्री के. जे. जाॅर्ज यानी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. मात्र मे वीज बिल दुप्पटीने वाढवुन कर्नाटक राज्यातील जनतेला काँग्रेस सरकारने मोठा शाॅक दिला. यावरून काँग्रेस दाखवायचे दात वेगळे व खायचे जात वेगळे असल्याचे कर्नाटकातील जनतेला दाखवून दिले.
यासंदर्भात खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेने वीज दरवाढ मागे घ्या व गृहज्योती योजना लवकरात लवकर सुरू करावी. या मागणीसाठी सोमवारी दि. १२ रोजी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उर्जामंत्री के. जे. जाॅर्ज यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस सरकारने मे महिन्याच्या वीज बिलात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सामान्य नागरिकांना दुप्पटीने वीज बीले भरणे परवडणारे नाही. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे.
तेव्हा वीज दरवाढ मागे घ्यावी. तसेच गृह ज्योती योजनेंतर्गत २०० युनिट मोफत वीज पुरवठा याची लवकर अमलबजावणी करावी.
निवेदन देताना भाजप युवा नेते पंडित ओगले, मल्लाप्पा मारीहाळ, आनंद पाटील, दिलीप सोनटक्के, पंकज कुट्रे, तसेच खानापूर शहरातील युवा कार्यकर्ते, नागरीक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी तहसीलदारांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांच्याकडे निवेदन पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta