खानापूर : खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल भागातील खेड्यांना रस्ते तसेच वीज पुरवठ्याचे काम करताना वन खाते नेहमीच या-ना त्या कारणाने कामात अडथळा आणतात. तेव्हा वन खात्याने सहकार्याची भावना ठेवून जंगल भागातील खेड्यांच्या विकासास सहकार्य करावे. सर्वच कामे कायद्यावर बोट ठेवून करता येत नाही.
जंगलातील खेड्यांच्या समस्या सोडवायच्या असतील वनखात्याने सहकार्य करत विकास कामाना चालना द्यावी. अन्यथा जनतेचा रोष लोकप्रतिनिधीच्या वर राहिल. तेव्हा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी याची जाणीव ठेवून सेवा करावी, असे मत नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी मंगळवारी दि. १३ रोजी तालुका पंचायतीच्या सभागृहात बोलाविलेल्या तालुका विकास आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.
व्यासपीठावर नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी श्री. इरनगौडा आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी डी. बी. चव्हाण यांना कृषी खात्याच्यावतीन तालुक्यात पेरणीसाठी बी बियाणांचे वाटप तसेच खताचे वाटप करण्यात आले. अभिलाषा भात बियाणांचा साठा नाही असे सांगीतले. हेस्काॅम खात्याचे अधिकारी कल्पना तिरवीर यानी जंगल भागात पावसाने विधुत खांबे कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत होता. मात्र दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला, असे सांगितले.
बागायत खात्याचे अधिकारी, बालकल्याण खात्याचे, सोशल फाॅरेस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते आदी अधिकाऱ्यांनी माहिती आढावा दिला.
यावेळी के एस आर टी सी, बीईओ अधिकारी उपस्थित नव्हते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta