खानापूर : खानापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभेला नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर शहरात भूमिगत गटारी नसल्यामुळे शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते तसेच नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे.
मलप्रभा नदीपात्रात गटारीतून वाहून आलेला गाळ, घाण, केरकचरा, टाकाऊ वस्तूंचा नदीपात्रात खच पडला आहे. पावसाअभावी नदीपात्र कोरडे पडल्यामुळे नदीचे बकाल रूप समोर आले आहे. अधूनमधून होणाऱ्या वाळीवामुळे नदीपत्रात पाणीसाठा शिल्लक राहत होता. त्यामुळे नदीतील घाण वाहून जात होती मात्र यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पुलाजवळ घाण केरकचरा साचला आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी नगरपंचायतीने नदीपात्रातील गाळ काढून स्वच्छता मोहीम राबवून मलप्रभेतील घाण, केअर कचऱ्याचे उच्चाटन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी केली आहे.