खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन लागुन असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
सध्या पावसाची सुरूवात होत आहे. त्यामुळे गटारीत घाणीचे साम्राज्य असल्याने घाणीचे दुर्गंधी तसेच गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
याचा त्रास नागरीकांना होऊन त्यातच डासांचा उपद्रव वाढला आहे.
तेव्हा ग्राम पंचायतीच्या पीडीओनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळ्याच्या आत गटारीतील घाण काढुन टाकावी. तसेच रस्त्याची डागडुजी करावी. कारण पावसाळा सुरू झाला तर रस्त्याची दुरावस्था होणार त्यानंतर रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होणार आहे. तेव्हा हलकर्णी ग्राम पंचायतीच्या पीडीओनी लवकरात लवकर गटारीत स्वच्छता व रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना येथील रहिवासी व कंत्राटदार विष्णू बेळगावकर म्हणाले की, हलकर्णी ग्राम पंचायत ही खानापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या विकास कामाना महत्व देणे गरजेचे आहे. मात्र हलकर्णी ग्राम पंचायतीच्या पीडीओनी कोणतीच विकास कामे केली नाही
गटारीची स्वच्छता केली नाही. की रस्त्याचा विकास केला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा नुतन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी जातीने लक्ष देऊन व प्रत्यक्षात भेट देऊन समस्येची जाणीव करून घ्यावी. व अधिकारी वर्गाला सुचना करून समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे.