
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत मऱ्याम्मा देवीची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवार दि. १३ व बुधवारी दि. १४ असे दिवस साजरी करण्यात आली.
यावेळी मंगळवारी सकाळी मऱ्याम्मा देवीला अभिषेक, विधीवत पुजा व गाऱ्हाणे घालुन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर मानकऱ्यांच्या ओट्यावर भरून दिवसभर ओटी भरण्याचा कार्यक्रम व नैवेद्य अर्पण करण्यात आला.
बुधवारी सकाळी देवीला गाऱ्हाणे घालुन विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर भाविकांनी ओट्या भरून नवस फेडला. रात्री उशिरापर्यंत मऱ्याम्मा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
गेल्या कित्येक वर्षांपासून मऱ्याम्मा देवीची यात्रा साजरी करण्यात येत आहे. यंदा ही खानापूर तालुक्यासह बेळगाव, कोल्हापूर, गोवा आदी ठिकाणाहुन भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेनिमित्त मंदिराच्या आवारात विविध प्रकारची दुकाने, पाळणे, आदीचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta