खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलविण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका आरोग्य केंद्र कार्यालयावर मराठी भाषेत फलक लावावा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 मे 2023 रोजी खानापूर तालुका आरोग्य अधिकारी खानापूर यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. तसेच हेस्कॉम अधिकारी खानापूर यांनी घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या वीज बिलाची दुपटीने वाढ करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील जनतेला नाहक भर्दंड सोसावा लागणार आहे. यासंदर्भात हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी पुढील रूपरेषा ठरविणेबाबत तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी व मराठी प्रेमी जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई व कार्याध्यक्ष यशवंतराव बिरजे यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta