खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची डागडुजी अथवा डांबरीकरण झालेच नाही. त्यामुळे सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांना दुचाकी अथवा चार चाकी गाड्यावरून येताना त्रास होत आहे.
गेल्या पाच वर्षांत सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची कधी दखलच घेतली गेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन रोडवरून सरकारी दवाखान्यात प्रवेश करताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे.
येत्या पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे तसेच पावसामुळे चिखल होण्याचा संभव असल्याने पावसाळ्यात सुद्धा रुग्णाना ये-जा करताना चिखलाशी सामना करावा लागतो.
सरकारी दवाखान्याच्या दुरूस्तीसाठी निधी येतो की नाही. येत असेल तर रस्त्याची दुरावस्था का? मग निधी कुठ जातो? असा प्रश्न तालुक्यातील जनतेतुन चर्चिला जात आहे.
तेव्हा अद्याप एकदा ही सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण झालेच नाही. यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतुन होताना दिसत आहे.