खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर- बेळगाव महामार्गावरून प्रवाशी, शाळा -काॅलेज विद्यार्थी, तसेच कामगार यांची दररोज बसस्थानकावर बससाठी गर्दी असते.
सकाळच्या वेळेत बेळगावला जाण्यासाठी शाळा, काॅलेज विद्यार्थी, प्रवासी, तसेच कामगार शहरासह ग्रामीण भागातून खानापूर बेळगाव असा प्रवास करतात.
सध्या खानापूर बेळगाव मार्गावर बसेसची संख्या फारच कमी आहे.
त्यामुळे शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थी, कामगार व प्रवासी याची बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तशातच महिलांना मोफत बससेवेचा लाभ दिल्याने महिलांचीही गर्दी वाढली. त्यामुळे खानापूर -बेळगाव बसेस कमी पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थी बसच्या दरवाजात उभे राहून जीव घेणा प्रवास करताना दिसत आहेत.
ही समस्या सोडविण्यासाठी खानापूर- बेळगाव जादा बसेस सोडण्याची मागणी भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बेळगाव विभागीय नियंत्रक श्री. राठोड यांची नुकताच भेट घेऊन समस्यांचे कथन केले.
यावेळी बेळगाव विभागीय नियंत्रक श्री. राठोड यांनी दररोज सकाळी ८ ते १० या वेळेत व सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन जादा बसेस सोडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कचेरी हे उपस्थित होते.
खानापूर -बेळगाव जादा बसेस सोडण्याचे आश्वासन दिल्याने खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतूनन समाधान पसरले आहे.