खानापूर : खानापूर शहरातील जेएमएफसी न्यायालयात शनिवारी दि. ८ जुलै रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक अदालतीचे धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाण घेवाण, स्थावर प्राॅपर्टी मालमत्ता अशा विविध न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश झरिना मॅडम यांनी शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी न्यायमुर्ती सूर्यनारायण तसेच न्यायमुर्ती वीरेश हिरेमठ आणि तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी म्हणाले की, लोक अदालतीत अनेक प्रलंबित प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी लोक अदालतीत न्याय मिळतो. याचा ग्राहकांना लाभ होतो. या लोक अदालतीत अनेक संसाराची प्रकरणे तोडगा काढुन मार्ग मोकळा केला आहे. तसेच सहकार क्षेत्रातील देवाणघेवाणीची प्रकरणे तडजोडीने पूर्ण झाली आहेत. त्यामुळे लोक अदालीतीचा फायदा सामान्य जनतेला व्हावा. या उद्देशाने येत्या ८ जुलै रोजी लोक अदालतीत नागरीकांनी हजर राहून न्याय मिळवून घ्यावा, असे या वेळी करण्यात आले आहे.
यावेळी न्यायाधीशांनी सांगितले की, न्यायालयीन फी माफ करण्यात येणार कारण लोक अदालतीत ज्या प्रकरणावर तोडगा काढण्यात येणार अशा प्रकरणाची न्यायालयीन फी माफ होणार आहे. तर प्रलंबित प्रकरणाबाबत न्यायालय अनेकांना दंड घालून निर्धारित शुल्काची आकारणी करते मात्र लोक अदालतीत जी प्रकरणे निकालात काढली जाणार आहेत. त्याप्रकरणाना मात्र निर्धारित न्यायालयीन शुल्क जाते. ते माप केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी ऍड आर एन पाटील, ऍड जी जी पाटील, ऍड सिध्दार्थ कमलेश्वरी, ऍड एन वाय कदम, ऍड लोकरे, ऍड एस के नंदगडी, ऍड इर्शाद नाईक, ऍड केशव केळकर आदी उपस्थित होते.