Thursday , December 11 2025
Breaking News

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर : खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित खानापूर-बेळगाव, रामनगर, हलियाळ, अळणावर व तत्सम भागातील पुणेस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थी- पालक मार्गदर्शन मेळावा नुकताच येथील सुवासिनी मंगल कार्यालय, वडगांव बुद्रुक, पुणे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विश्वास उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब पोकळे, भाजपा युवा मोर्चाचे सहचिटणीस सारंग नवले प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर आणि सुप्रसिद्ध उद्योजक राजेश मंडलिक उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष पीटर डिसोझा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीपप्रज्वलनानंतर सौ. रमा बाळेकुंद्री यांनी गणेश वंदना तर संचालक केशव जावळीकर यांनी प्रार्थना सादर केली. सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाला इयत्ता दहावी आणि बारावीचे अनेक विद्यार्थी आणि पालक तसेच मंडळाचे अनेक सभासद सहपरिवार व मित्र परिवारासह उपस्थित होते. उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्याबरोबरच खेळाडूंचाही यावेळी गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांनी आपले वडील कै. रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षिसे दिली तर शांताराम बडसकर आणि नितेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना विवेक वेलणकर लिखित “१०वी/१२वी नंतरची शाखानिवड” हे पुस्तक भेट दिले. याप्रसंगी उपस्थित पाहुणे आणि वक्त्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना मौलिक मार्गदर्शन केले. सह-सचिव सुरेश हालगी आणि सह-खजिनदार परशुराम निलजकर यांनी सुत्रसंचलन केले तर संचालक देमानी मष्णूचे यांनी आभारप्रदर्शन केले. यानिमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, रामचंद्र निलजकर, अशोक पाटील, रामू गुंडप, विजय पाटील, रामचंद्र बाळेकुंद्री, संचालक बाळकृष्ण पाटील, नारायण गावडे, राजाराम शिंदे, पांडुरंग पाटील, परशुराम चौगुले यांबरोबरच अनेक सभासदांनीही अथक परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *