खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामातील रयत सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत कृषी खात्याने विमा योजना जारी केली आहे. तेव्हा खरीप हंगामातील विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी केले.
खानापूर तालुक्यात चार महसुल विभाग असुन या महसूल विभागात फसल विमा योजनेंतर्गत येणाऱ्या बिडी महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पावसावर आधारीत भात पिकावर, तर गुंजी महसुल विभागांतर्गत भात, शेंगा, नाचना, जांबोटी महसुल केंद्रांतर्गत भात, शेंगा, नाचना व बटाटे, तसेच खानापूर महसुल केंद्रांतर्गत सोयाबीन, जोंधळा, भात, शेंगा यापिकावर विमा उतरता येणार आहे.
यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या स्वताच्या मोबाईल वर गुगल प्ले स्टोअर वरून लिंक डाऊन करा, अशी माहिती खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यानी दिला आहे.