खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालय आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
बोलताना यावेळी कन्नड विभागाच्या प्रमूख श्रीमती मेघना नाईक म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आदराला प्राप्त व्हावे. कोणीही शिक्षक कोणाही विद्यार्थ्याकडे कोणत्याही दुजाभावनेने पाहत नसतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे त्यांना वरचेवर जबाबदारीची जाणीव करून देणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, वर्गात उभे करणे, इत्यादी कारणाने विद्यार्थ्यांच्या एकूण उत्कर्षासाठी प्रत्येक शिक्षक हा हाडाचे पाणी करत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या शिक्षकावर रागावू नये किंवा कुठल्याही प्रकारची नकारत्मक भावना ठेवू नये. हे पटवून देताना त्यानी भगवान परशुराम आणि कर्ण यांच्यातील गुरू शिष्य नाते यांच्या बध्दल सांगून एखाद्या शिक्षकाच्या अनादरस प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो हे त्या कथेच्या माध्यमातून त्यानी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेले राज्यशास्त्राचे अध्यापक श्री. एम. एस. कमार यांनी विद्यार्थ्यांना अरिस्टॉटल आणि अलेक्झांडर यांच्यातील गुरु शिष्या बद्दलची माहिती सांगून गुरु शिष्य यांच्यातील नाते प्रेम भक्ती श्रद्धा आदर आदी अनेक भावना त्यांनी व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. एच. नाईक यानी महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पुजन करुन या कार्यक्रमाला चालना दिली.कुमारी सानिका देसाई व सहकारी यानी प्रार्थना व कुमारी कोमल व सहकारी यानी स्वागतगीत सादर केले. कु. वैष्णवी राणे व कु. स्वाती मिराशी यानी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्टीय सेवा योजनाधिकारी यानी केले. यावेळी एन. एस. एस. चे व महाविद्यालयाचे सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta