खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना, उपघटक खानापूर तालुका, यांची महत्त्वाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष व समिती यांनी केले आहे.
या बैठकीत विश्व योगा दिन साजरा करणेबाबत योग शिक्षक श्री. अरविंद कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच पुढील सहा महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाचे चर्चा करून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयावर सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे. तरी जेष्ठ नागरिक संघटनेच्या सभासदांनी व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta